निराधाराच्या अंत्यसंस्कारासाठी पुन्हा धाऊन आले अंबादास दानवे

राधाराच्या अंत्यसंस्कारासाठी पुन्हा-Again for Radhara's funeral

निराधाराच्या अंत्यसंस्कारासाठी  पुन्हा धाऊन आले अंबादास दानवे………….

 जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सिडकोमधील हॉटेल मध्ये काम करणाऱ्या प्रदीप पवार या निराधार कामगारांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी सिडकोतील एका हॉटेलमध्ये मरण पावलेल्या प्रदीप गंगाधर पवार या कामगारांच्या मृत देहाशी रक्ताचे नाते सांगणारा मोठा भाऊ संदीप पवार आणि चुलता नारायण पवार यांनी मृत देहाकडे पाठ फिरविली.प्रदीप पवार यांचा मृत देहावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दर्शवली असतांना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी वृत्रपत्रामध्ये वृत्त वाचल्यानंतर सिडकोतील पोलीस निरीक्षक श्री गिरी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.

राधाराच्या अंत्यसंस्कारासाठी पुन्हा-Again for Radhara's funeral

यानंतर अंबादास दानवे यांनी प्रदीप पवार यांचा मृत देह घेण्यासाठी कुटुंबातील कोणीही व्यक्ती समोर येत नसल्याचे लक्षात येताच कामगाराच्या मृत्यूवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. कैलासनगर येथील स्मशानभूमीत कामगारावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याचबरोबर स्वतः मुखाग्नीही दिला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here