तुमच्या मदतीला आम्ही आहोत, काही असेल तर कळवा – आमदार दानवे

तुमच्या मदतीला आम्ही आहो-We are here to help you

तुमच्या मदतीला आम्ही आहोत, काही असेल तर कळवा – आमदार दानवे

सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाद होत आहे. याच पार्श्वभूमीवर गजानन नगर कंटेन्मेंट झोन येथे कोरोना रुग्ण अढल्यामुळे एकच खळबळ माजून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आज आमदार आंबदास दानवे यांनी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला तसेच त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमच्या मदतीला आम्ही आहोत. आम्हाला तुमच्या अडचणी कळवा आम्ही तुमच्या मदतीला येऊ. परंतु तुम्ही लॉकडाऊनचे कठोर पालन करा. तरच कोरोनाचा नायनाट होईल असे जिल्हाप्रमुख तथा आमदार दानवे यांनी गजाजननगर पसिरातील नागरिकांना आवाहन केले होते.

यावेळी विधानसभा संघटक तथा नगरसेवक राजू वैद्य, आत्माराम पवार, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, वामनराव शिंदे, उपविभागप्रमुख दीपक पवार, योगेश नलावडे, ज्ञानेश्वर तुपे, मुकुद सोमदे, अनिल गायके, संदीप मते, लक्ष्मण शर्मा आदिंची उपस्थिती होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here