शिवसेना व युवासेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

शिवसेना व युवासेनेतर्फे-On behalf of Shiv Sena and Yuvasena

शिवसेना व युवासेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण वाढले आहे. त्यातच वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुरेशी आरोग्य सेवा पुरवणे हे देखील एक आव्हान बनत आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रक्तदानाचे आवाहन केले होते. राज्यात रक्त संकलनाचे प्रमाण वाढवून रक्ताचा भासतात असलेला तुटवडा कमी करण्यासाठी हे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्था व पक्षांतर्फे, शाखांतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांच्या त्याच आवाहनाला प्रतिसाद देत औरंगाबादेत देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मयूर पार्क, सुरेवाडी या भागात हे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले गेले होते. ज्यामध्ये लॉक डाउनचे सर्व नियम पळत सुमारे ३१० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिरास उपस्थित जवळपास सर्वांनीच रक्तदान केले असून, या रक्तदान शिबिराचे उत्तम व्यवस्थापन युवासेनेचे अभिजित थोरात व त्यांच्या टीमने केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here