जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले

जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३५ वा पालखी सोहळा आज देहू येथे पार पडत असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले आहे. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर ३० जून रोजी हेलिकॉप्टर किंवा बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.

या प्रसंगी दरवर्षी देहू नगरी ज्ञानोबा-तुकारामच्या गजराने दुमदुमून गेलेली असते. मात्र, यावर्षी करोनाचं संकट असल्याने अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आहे. मुख्य मंदिराच्या इथून पालखीने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रस्थान ठेवले. तर, देहू नगरीत महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून वारकऱ्यांनी येऊ नये असे आवाहन विश्वास्थांकडून करण्यात आले होते. त्याला वारकरी संप्रदायाकडून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

दरम्यान, संपूर्ण देहू नगरीत आज शांतमय वातावरण पाहायला मिळाले.  पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावणार असून ३० जून रोजी  हेलिकॉप्टर किंवा बसने पंढरपूरला रवाना होणार आहे. आज मुख्य मंदिर परिसर हा  ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने दुमदुमून गेला होता. मंदिराच्या आत उपस्थित वारकऱ्यांकडून सोशल डिस्टसिंगचं तंतोतंत पालन करण्यात आलं. मंदिराच्या पटांगणात आखलेल्या गोल वर्तुळांमध्ये शिस्तीत उभे राहून सर्व वारकरी, टाळकरी हरीनामाचा जयघोष करत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here