गुंजवणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात

गुंजवणी-प्रकल्पाच्या-प्र-Gunjavani-Project-Q

देशातील पहिलाच प्रकल्प

थेट जलवाहिनीतून सिंचनाद्वारे पाणी वितरण करण्याचा देशातील पहिल्या गुंजवणी प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. १००६ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ८३ किलोमीटपर्यंत काम करण्यात येणार आहे.

धरणातून शेतकऱ्यांना थेट जलवाहिनीद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणारा गुंजवणी प्रकल्प के ंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप्ड इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १३१३ कोटी रुपये खर्चाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. गुंजवणी प्रकल्पाची क्षमता ४.१७ अब्ज घनफू ट (टीएमसी) असून त्याद्वारे भोर, वेल्हा, पुरंदर या तीन तालुक्यांमधील २१ हजार ३९२ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. वर्षभर २४ तास विजेशिवाय उच्चदाबाने प्रति शेतकरी सहा एकरी पाणी असा निकष ठरवून पाणी वितरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे ८३.७०० कि.मी. लांबीची बंद वाहिनी डावा कालवा आणि २०.३७८ कि.मी. लांबीचा उजवा कालवा करण्यात येणार आहे.

त्याद्वारे वेल्हे तालुक्यातील ८५० हे., भोरमधील ९५३५ हे. आणि पुरंदर तालुक्यातील ११ हजार १०७ हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

प्रकल्पाविरोधात दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल के ल्याने या प्रकल्पाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले होते. नोव्हेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने निकाल दिला असून कामाला मंजुरी दिली आहे. याशिवाय पश्चिम घाट पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असल्याने या ठिकाणी कोणत्याही विकास प्रकल्पाला मान्यता देता येत नाही. हा प्रकल्प पर्यावरणाची हानी करणारा नसला, तरी के ंद्रीय पर्यावरण समितीचे ना-हरकत घेण्यात आले आहे. एल अ‍ॅण्ड टी कं पनीमार्फत जलवाहिनीच्या व्यासाची तपासणी सुरू करण्यात आली आहे, असेही कोल्हे यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

पाणीचोरी, बाष्पिभवन, गळती आणि दूषित पाणी याला पूर्णपणे आळा बसणार आहे. परिणामी पाणी बचत होऊन प्रकल्पाची कार्यक्षमता वाढेल. कोणताही वीज अथवा पंप न वापरता पाणी वितरण व्यवस्था करण्यात आल्याने आर्थिक खर्च कमी होणार आहे. पाणी वितरणासाठी धरणातील पाण्याच्या दाबाचा उपयोग करण्यात आल्याने सूक्ष्म सिंचनाचे धरण ते तीन हे. क्षेत्रापर्यंत बंदिस्त वाहिनीद्वारे पाणी देणे शक्य आहे. मुख्य वाहिनीचा व्यास कमी करून वितरिका व लघु वितरिका यांचाही व्यास कमी के ल्याने जागेचा अपव्यय टाळता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here