Skip to content Skip to footer

पुलवामामध्ये दहशतवादी गोळीबारात 2 जवान हुतात्मा, 5 जखमी

श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी नी पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 2 जवान हुतात्मा झाले असून, पाच जवान जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पोलिस लाईन भागात आज (शनिवार) पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात विशेष कारवाई पथकातील एक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान हुतात्मा झाला आहे. तर, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चार आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस लाईनमधील 36 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

अवश्य वाचा – ‘ब्ल्यू व्हेल’ ची दहशत

पोलिस लाईन परिसरात दोन-तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. लष्कराचे जवान आणि पोलिसांकडून परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5