Skip to content Skip to footer

आरक्षण : जातीनिहाय आरक्षणाला धक्का लावणार नाही – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: देशात आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये आरक्षण मागणीसाठी आंदोलने होत आहे. महाराष्ट्रातही मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. यावर आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. याबाबत कोणालाही शंका घेण्याची गरज नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी एनआरसी, आरक्षण आणि मॉब लिंचिंगसारख्या विविध विषयांवर आपले मत मांडले. तसेच भाजपला पराभूत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली महाआघाडी फार काळ टिकणार नाही. याशिवाय आमच्या सरकारने गेल्यावर्षी आमच्या देशातील एक कोटी युवकांना रोजगार दिल्याचा दावाही यावेळी मोदींनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी लोग रस्त्यावर उतरले आहे. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. याबाबत कोणालाही शंका घेण्याची गरज नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्ने देशाची ताकद आहे आणि आम्ही ती पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. “सबका साथ, सबका विकास’ हा आमचा उद्देश आहे. गरीब, पीडित, दलित, मागास, आदिवासी आणि ओबीसी समाजातील लोकांचे हित जपणे गरजेचे आहे.

एनआरसीच्या मुद्यावर कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. ज्या नागरिकांची नावे यादीत नाहीत, त्यांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. तसेच ज्या लोकांचा स्वत:वरचा विश्वास उडला आहे, ज्यांना देशातील नागरिकांच समर्थन नाही, जे देशातील महत्त्वाच्या संस्थांवर विश्वास ठेवत नाहीत, तेच लोक देशाचे तुकडे करण्याच्या गोष्टी करतात, असे म्हणत मोदी यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या मुद्द्यावरही मोदींनी मौन सोडले आहे.

अशा घटना दुर्दैवीत आहेत. सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता आणि एकता निर्माण करायला हवी. अशा घटनानांवर आणि अशा मानसिकतेवर आम्ही अनेकदा स्पष्ट शब्दांत आमची भूमिका मांडली आहे. त्यामुळे अशा घटनांचे समर्थन होऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले.

महाआघाडी फार काळ टिकणार नाही 

भाजपला पराभूत करण्यासाठी एक आलेल्या विरोधकांनी महाआघाडीची स्थापना केली आहे. ही महाआघाडी फार काळ टिकणार नाही. फक्त ही महाआघाडी निवडणुकी आधी तुटते की निवडणुकीनंतर हे पाहावे लागणार आहे. महाआघाडी वैचारिक समर्थन, जनतेच्या अपेक्षा, विकास, वैचारिक एकतेसाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी या महाआघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

भाजपच्या लोकप्रियतेबाबत विरोधीपक्ष चिंतीत आहे. त्यामुळे एकट्याने लढण्याची हिंमत विरोधकांमध्ये राहिली नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Leave a comment

0.0/5