Skip to content Skip to footer

केरळ साठी परकी मदत न स्वीकारण्याचा निर्णय

नवी दिल्ली – पुराने जबरदस्त तडाखा दिलेल्या केरळ च्या पुनर्वसनासाठी परकी आर्थिक मदत न स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केरळमधील मदतकार्यासाठी 700 कोटी रूपयांचे सहाय्य करण्याचा प्रस्ताव संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) देण्यात आला.

यूएईमध्ये राहणाऱ्या सुमारे 30 लाख भारतीयांपैकी जवळपास 80 टक्के केरळचे रहिवासी आहेत. यूएईच्या प्रगतीमध्ये असणाऱ्या त्यांच्या योगदानाचा विचार करून त्या देशाने मदतीचा प्रस्ताव दिला. मालदीवनेही 35 लाख रूपयांची मदत देऊ केली. संयुक्त राष्ट्रांकडूनही मदतीचा विचार केला जात असल्याचे समजते.

यापार्श्‍वभूमीवर, कुठली परकी मदत न घेता केरळच्या पुनर्वसनासाठी देशांतर्गत प्रयत्नांवरच अवलंबून राहण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.

Leave a comment

0.0/5