नवी दिल्ली – स्टाफ सिलेक्शन कमिशनने ( एसएससी ) पुन्हा एकदा Phase VI या पदासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. उमेदवार आता 12 आॅक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. आयोगाने (एसएससी) अखेरची तारीख 30 सप्टेंबरवरून 5 आॅक्टोबर अशी केली होती. मात्र उमेदवारांच्या सुविधेसाठी एसएससीने पुन्हा एकदा अंतिम तारखेत वाढ करून आता 12 आॅक्टोबर अशी तारीख केली आहे. उमेदवार अर्ज प्रक्रियेचे शुल्क 15 आॅक्टोबरपर्यत भरू शकतात.
दरम्यान 130 श्रेणी अंतर्गत विविध विभागात 1136 रिक्त पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवाराची निवड काॅम्प्यूटर बेस परिक्षेअधारे करण्यात येईलय उमेदवार स्टाफ सिलेक्शन कमीशन यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
एसएससी Phase VI साठी अशाप्रकारे करा अर्ज
1. प्रथम स्टाफ सिलेक्शन कमीशन यांच्या अधिकृत वेबसाईट ssconline.nic.in वर जा.
2. वेबसाईटवर होमपेजवर जा. Click here to apply या लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर त्या पेजवरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.