काश्मीर : सात मतांनी उमेदवाराची हार, विजयी उमेदवारास 9 मतं

काश्मीर निकाल : सात मतांनी उमेदवाराची हार, विजयी उमेदवारास 9 मतं | kashmir election

नवी दिल्ली – काश्मीरमधील शंकरपुरा मधील भाजप उमेदवार बशीर अहमद मीर श्रीनगर नगरपालिका निवडणुकीत केवळ सात मतांच्या अंतरानी नगरसेवक म्हणून निवडून आले. गमंतीची बाब म्हणजे, 8 आॅक्टोबरला शहराच्या शंकरपुरा वार्डात केवळ 9 मतं पडली होती. मीर यांना आपल्या विजयाबदल इतकी खात्री होती की, मतदान संपल्यानंतर त्यांनी लगेच मतदान केंद्रावर आपण जिंकल्याची घोषणा केली होती.

त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वार्डमध्ये एकूण 9 मतं पडली होती, त्यापैकी 8 मतं मला मिळाली. माझ्या विरोधी उमेदवाराला केवळ 1 मत मिळालं. एसकेआयसीसी मध्ये मतमोजणी झाली.

दरम्यान शहरातील बाघी महंता परिसरातील शंकरपुरा वार्डात चार टप्यातील शहरी स्थानिका निवडणूकाआधी पहिल्या टप्यात मतदान घेण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here