इस्रो २०२२ पर्यंत मानवाला अंतराळात पाठवणार – सीवन

इस्रो २०२२ पर्यंत मानवाला अंतराळात पाठवणार - सीवन | ISRO to send human in space by 2022

गोरखपूर – जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१९ मध्ये भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान-२ मोहीम पूर्ण होईल. तसेच २०२२ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पहिल्यांदा मानवाला अंतराळात पाठवेल, असे इस्रोचे प्रमुख कैलाशवादिवू सीवन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सीवन पुढे म्हणाले, आम्ही मानवाला अंतराळात पाठविण्याची डेडलाईन निश्चित केली असून आम्ही मानवाला २०२१ च्या अखेरीस अथवा २०२२ च्या सुरुवातीला अंतराळात पाठवू. सीवन हे डीडीयू गोरखपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहाचे मुख्य अतिथी आहेत. चंद्रयान-२ पुढील वर्षी जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात चंद्रावर पाठविले जाऊ शकते. हे यान डिझाईन करताना, ते सहजपणे चंद्रावर उतरेल आणि चंद्राच्या पृष्ठबागावरून संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर सामग्री गोळा करेल, याची दक्षता घेण्यात आली आहे. पुढील तीन ते सहा महिन्यात इस्रोचे वैज्ञानिक तीन ते चार मिशनवर काम करणार आहेत, असे सीवन यांनी सांगितले. अनेक स्तरांवर देशाची इस्रो सेवा करत आहे. यात दूर संचार, नेव्हिगेशन, अंतराळ विज्ञान आदिंचा समावेळ आहे. एवढेच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिक कुठल्याना कुठल्या स्वरूपाने इस्रोशी जोडला गेलेला आहे, असेही सीवान म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here