Skip to content Skip to footer

लग्नावेळी लपवली जात, ब्राह्मण म्हणून लग्न करणाऱ्याविरोधात तक्रार

अहमदाबाद: नवऱ्याने लग्नावेळी जात लपवून ठेवली आणि आपण ब्राह्मण असल्याचं सांगून लग्न केलं, म्हणून एका तरुणीने पोलिसात तक्रार केली आहे. एकता पटेल असं या तरुणीचं नाव असून ती गुजरातमधील मेहसाणा येथील रहिवासी आहे.

2017मध्ये 23 एप्रिल रोजी एकताचं लग्नं यश मेहता या तरुणाशी झालं होतं. लग्नाच्या काही काळ आधीच एकताने एम कॉमचं शिक्षण पूर्ण केलं होतं. कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने एकताने जोत्स्ना मेहता नावाच्या महिलेच्या फर्ममध्ये अकाउंन्टट पदासाठी अर्ज केला. तिथे तिला महिना पाच हजार रुपयाची नोकरीही मिळाली. नोकरीवर रुजू झाल्यानंतर तिची ओळख ज्योत्स्नाचा मुलगा यश याच्याशी झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी 23 एप्रिल रोजी लग्नही केलं. लग्नापूर्वी एकताने यशला त्याची जात विचारली होती, तेव्हा त्याने आपण ब्राह्मण असल्याचं सांगितलं होतं.

लग्नानंतर एकता आणि यशचा संसार सुरू झाला आणि एक दिवस एकताला यशचं खरं आडनाव खमार असं असल्याचा शोध लागला. जेव्हा तिने यशला त्याच्या खऱ्या आडनावाबद्दल विचारलं तेव्हा त्याने ब्राह्मण नसल्याचं कबूल केलं. यानंतर एकताने पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

Leave a comment

0.0/5