Skip to content Skip to footer

अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाला रामराम

मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

Film and Television Institute of India म्हणजेच एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी सोपवला असून, कामाच्या व्यापामुळे आणि एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाला दिलेल्या वेळामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं.

‘अतिशय मानाच्या अशा एफटीआयआयचं अध्यक्षपद भूषवणं ही माझ्यासाठी अतिशय मानाची बाब आणि एक सुवर्णसंधीच होती. ज्या संधीतून खूप काही शिकता आलं. पण, माझ्या काही आंतरराष्ट्रीय कामांमुळे मी यापुढे या शिक्षणसंस्थेला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळेच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला आभारी….’,  असं ट्विट त्यांनी केलं.

गजेंद्र चौहान यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर खेर यांनी ११ ऑक्टोबर, २०१७ मध्ये या संस्थेच्या अध्यपदाचा अधिभार सांभाळला होता.

Leave a comment

0.0/5