Skip to content Skip to footer

स्विस बँकेपेक्षा जास्त पैसा भारतीयांनी फस्त केला

स्विस बँकेपेक्षा जास्त पैसा खुद्द भारतीयांनीच ग्रामीण विकासाच्या नावे फस्त केला आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट पंजाबमधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला आहे. भारतीयांनी शेती व ग्राम विकासाच्या नावे आतापर्यंत 54 हजार 250 कोटी रुपये जिरवले आहेत, अशी माहिती या कार्यकर्त्याने दिली आहे.

रोहित सभ्रवाल नावाच्या या कार्यकर्त्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आऱबीआय) माहिती मागितली होती. त्यात प्रश्न विचारला होता, की लोकांनी कर्ज घेऊन परत केलेच नाही अशी बँकांची किती रक्कम आहे. आऱबीआयने त्यांना आतापर्यंत केवळ राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकांकडे असलेली यादी दिली आहे. त्यातील आकडे वाचून त्यांचे डोळेच विस्फारले.

या माहितीनुसार, आतापर्यंत भारतीय लोकांनी बँकांचे 54 हजार 250 कोटी रुपये बुडवले आहेत. याशिवाय केवळ एका व्यक्तीने 100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज घेऊन फेडलेच नाही अशी बँकांची 375 कोटी रुपये रक्कम बुडाली आहे. ही आकडेवारी केवळ मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण विकास बँका आणि राज्य सहकारी बँकांची आहे. आणखी बँकाकडील माहिती आल्यावर ही रक्कम आणखी वाढेल, असे सभ्रवाल यांनी पंजाब केसरी वृत्तपत्राला सांगितले.

Leave a comment

0.0/5