Skip to content Skip to footer

जाणून घ्या, वयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ बद्दल.

भदरी रियासतचे राजकुमार रघुराज प्रताप सिंह “राजा भैया” यांना तुफान सिंह या नावाने सुध्दा ओळखले जाते. ३१ मे रोजी त्यांच्या जन्म प्रतापगढ येथील कुंडा येथे झाला. सध्या ते कुंडा येथून आमदार आहेत. मागे २०१२ मध्ये राजा भैया यांनी निवडणुकीच्या अर्जात स्वतःचे वय ३८ वर्ष लिहिले होते. त्यानुसार राजा भैया पहिल्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांचे वय फक्त १९ वर्ष होते या वरून बराच वाद उठला होता. गरीबांचा रॉबिनहूड म्हणून राजा भैयांना ओळखल्या जाते.

२० वर्षा अगोदर उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापगाढ येथील कुंडा येथे जाहीर सभेत घोषणा केली होती कि, गुंडा विहीन कुंडा करौं, ध्वज उठाय दोउ हाथ. कल्याण सिंहाचे राजकारण या घोषणेनंतर धक्के खात राहिले परंतु १९९६ साली ज्या आमदारास कल्याणसिंह यांना संपविण्याची प्रतिज्ञा केली तो आजही लोकात पहिल्या सारखाच लोकप्रिय आहे. आज पर्यंत ५ वेळेस अपक्ष निवडून आलेले आमदार राजाभैया आहेत. राजा भैया यांच्या सुरवातीच्या राजकीय जीवनात त्यांना भेटायचे असेल तर सर्वाना कुंडा येथे जावे लागत होते.

त्यांच्या राजवाडा हजारो एक्कर मध्ये बांधलेला आहे आणि त्यामध्ये हत्ती घोडे त्या राजवाड्याची आजही शान वाढवतात. राजा भैया यांचे आजोबा राजा बजरंग बहादुर सिंह हे स्वतंत्र सेनानी होते. पंतनगर कृषि विश्वविद्यालयचे वाईस चान्सलर आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असे अनेक पद त्यांनी उपभोगिले आहे.

राजा भैया महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत. सोबतच त्यांना मातीच्या चुलीवर बनलेला स्वयंपाक रोज द्यावा लागतो. आजही त्यांच्या राजवाड्यात मातीच्या चुलीवर व मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्या जातो. नॉन वेजचे शौकीन आहे राजा भैया जे मातीच्या भांड्यात बनविलेले हवे. राजा भैयाने वयाच्या ६ व्या वर्षी घोडस्वारीस सुरवात केली होती. आजही घोड्यावर ते रोज रपेट मारतात.

त्यांच्या २ फासोळ्या घोड्यावरून पडल्यामुळे मोडलेल्या आहेत. राजा भैयाच्या वडिलाने आजपर्यंत एकदाही मतदान केले नाही आहे किंवा राजा भैयाला मतदान करा अशी विनंती देखील केली नाही आहे. तरी देखील राजा भैया स्पष्ट बहुमताने निवडून येतात. राजा भैयांना बुलेट गाडीचा भारी शौक आहे.

वयाच्या १२व्या वर्षी त्यांना त्यांची पहिले बुलेट मिळाली होती. आणि फिएट गाडी वर ते पहिल्या वेळेस चारचाकी गाडी चालविणे शिकले होते. त्यांच्या राजवाड्यात लैंड रोवर, लैंड क्रूजर, बीएमडब्ल्यू सारख्या अनेख महागड्या गाड्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या बनावटीचे पिस्तुल जमा करण्याचा देखील छंद आहे. राजा भैयांना दोन मुले आणि दोन मुली आहेत जी सध्या शिक्षण घेत आहेत. त्यांच्या राजवाड्या मागे ६०० एकर मोठे असलेल तलाव आहेत. ज्यामध्ये अनेक मगर त्यांनी पोसलेले आहेत. असे सांगण्यात येते कि त्यांच्या विरोधकांना मारून ते या तलावात फेकून देतात.

आजही राजा भैयाच्या राजवाड्यासमोर दरबार भरतो जिथे ते न्यायदान करतात. रोज सकाळी अनेक महिला पुरुष त्यांच्या राजवाड्या समोर एका लाईनमध्ये उभे असतात राजाभैया त्यांचे भांडण तंटे सोडविण्याचे काम करतात. मागील २० वर्षाच्या काळात राजा भैया आणी त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांच्यावर अनेक फसवणुकीचे गुन्हे सोबत गंभीर खुनाचे गुन्हे सुध्दा आहेत. त्यांच्या वडील विषयी पोलीस रेकॉर्ड मध्ये नोंद आहे कि ते २० लोकांची टोळी चालवत असे उत्तर प्रदेशला अलग देश घोषित करण्या करिता हि टोळी काम करते असे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

उदय प्रताप सिंह यांना भेटायचे असल्यास त्यांच्या राजवाड्यापासून दूरवरच गाडी बंद करावी लागते कारण ते पर्यावरण प्रेमी आहेत त्यांना गाडीच्या इंजिनचा आवाज त्यांच्या राजवाड्यात सहन होत नाही. स्वतः राजा भैया सुध्दा हा नियम पाळतात आणि स्वतःची गाडी ढकलत राजवाड्यापर्यंत नेतात.

उदय प्रताप सिंह
उदय प्रताप सिंह यांचे शिक्षण ड्युन स्कूल मध्ये झाले आहे जिथे भारतातील राजघराण्यातील लोक मुले शिकतात. त्यांनी राजा भैयाच्या शिक्षणास विरोध केला त्यांच्या मते शिक्षणामुळे मुले भित्रे होतात. परंतु राजा भैयाच्या आईने त्यांना घरीच शिक्षण देण्याची व्यवस्था केली. ज्या कल्याणसिंहाने राजा भैयांना विरोध केला त्यांच्या मंत्री मंडळात राजा भैयांना स्थान द्यावे लागले. राजा भैया अपक्ष आमदार आहेत. मायावती शासन काळात त्यांच्यावर पोटा कायद्या अंतर्गत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. ज्या काळात ते जेलमध्ये होते त्या काळात एक डझन पेक्षा अधिक अधिकाऱ्याच्या बदल्या या जेलमध्ये करण्यात आल्या परंतु कोणीही ड्युटीवर जॉईन होत नव्हते. समाजवादी पक्षाच्या काळात परत ते मंत्री बनून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाले.

आजही राजाभैयांना त्यांच्या क्षेत्रातील लोक रॉबिनहूड समजतात त्याची पूजा करतात. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

0.0/5