दिल्लीच्या तख्तावर बसलेल्यांना महाराष्ट्राच्या पुढे झुकवलं ते शिवसेनेनेच! वाचा सविस्तर लेख

भाजपने जर पश्‍चिम बंगाल किंवा तमिळनाडूत काही चमत्कार केला तर शक्‍य आहे. अशावेळी जर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती केली नसती. भाजप स्वबळावर लढली असती तर जितके म्हणून शिवसेनेचे नुकसान झाले तितकेच भाजपचेही झाले असते हे खुद्द भाजपचे नेतेच सांगत होते.

येथे दुसरा एक मुद्दा हा आहे, की समजा जर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ फुलले असते तर सर्वशक्तिमान अमित शहा मातोश्रीची पायरी चढले असते का ? या राज्यातील पराभवाने शिवसेना अधिक आक्रमक होत गेली. त्यामुळे भाजप बॅकफूटवर आला.

आज मोदी लाट पूर्णपणे ओसरलेले आसतानाच भाजपला एक एक खासदार महत्त्वाचा ठरणार आहे. अशावेळी शिवसेनेने आपली भूमिका मोठ्या भावाची आहे हे भाजपला मान्य करायला लावले. भाजपनेही ‘मरता क्‍या नही करता’ या म्हणीनुसार शिवसेनेच्या सर्व अटी- शर्थी मान्य केल्या आहेत.

कोणी काही म्हणो आज शिवसेना-भाजपची जी युती झाली आहे त्याला एकमेव कारण आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. या दोघांचे जे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे युतीचा पूल पुन्हा बांधला आहे. दिल्लीश्‍वरांवर उद्धवांचा विश्वास दिसत नाही. काही असले तरी उद्धवच जिंकले आहेत असे म्हणावे लागेल.

तिसरा मुद्दा असा आहे, की जर भाजपला केंद्रात सत्ता संपादनासाठी शिवसेनेचा टेकू घ्यावा लागला तर आगामी विधानसभेत ( युतीला बहुमत मिळाले तर ) शिवसेनेचा मुख्यमंत्रीही भाजपला मान्य करावा लागेल. हे सर्व कोणाचे बळ किती यावर ठरणार आहे .

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संबंध कसे होते हे टीकाकारांनी आठवून पाहावे. धोरण लकवा झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढला होता हे कसे विसरता येईल ? पण सत्तेसाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस झाले गेले ते विसरून एकत्र आले. मग शिवसेनेने भाजपची युतीची साद ऐकली तर एवढा गदारोळ कशासाठी ? हे शिवसेनेच्या टीकाकारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

हवेची दिशा बदलताच भाजपच्या दिल्लीश्वरांना
मातोश्रीवर यावं लागलं.मानानं बरोबरीचं स्थानच
द्यावं लागलं.
बाकी काही म्हणा पण आज ही दिल्लीच्या तख्ता
वर बसलेल्यांना महाराष्ट्राच्या पुढे झुकवलं हेच
महत्वाचं
एक मराठी माणुस म्हणुन ह्याचा आदर नक्कीच

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here