Skip to content Skip to footer

अंबानीकडून सेना आणि पोलीस जवानांसाठी खास कार्यक्रम

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आकाश आणि श्लोका यांच्या विवाहाप्रीत्यर्थ १२ मार्च रोजी धीरूभाई अंबानी स्क्वायर मध्ये सेना जवान, पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय अश्या ७ हजार लोकांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात दोन फौंटन शो आयोजित करण्यात आले असून देश आणि शहर सुरक्षेत तैनात असलेल्या रक्षकांचा सन्मान आणि नवविवाहित जोडप्याला त्यांचे आशीर्वाद यासाठी हा कार्यक्रम आयोजित केले गेला आहे.

या रंगारंग कार्यक्रमात म्युझिकल फौंटन डान्सशो होत असून स्टेजवर पाणी, आकाश आणि जमीन यांचा संगम पाहायला मिळणार आहे. ४५ फुट उंचीची कारंजी उडणार आहेत. सेना आणि पोलीस विभाग कर्मचार्यांसाठी प्राचीन कथा राधाकृष्ण आणि वृंदावनातील गोपी यांच्या रासलीलेचा कार्यक्रम होणार आहे. त्यात देशविदेशातील १५० कलाकार सामील होतील. नीता अंबानी या संदर्भात म्हणाल्या, देशाची आणि शहराची सुरक्षा सांभाळणाऱ्या या शूर जवानांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण वेचावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे यासाठी हा प्रयत्न आहे. जवान आणि त्यांच्या कुटुंबीयासमवेत काही आनंदाचे क्षण हा आमचा गौरव आहे.

Leave a comment

0.0/5