Skip to content Skip to footer

अयोध्येतील लोक उद्धव ठाकरे यांना भेटून मानणार आभार

अयोध्येतील लोक उद्धव ठाकरे यांना भेटून मानणार आभार

राम मंदिर प्रश्नावर आक्रमक झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठ महिन्यात दोन वेळा अयोध्या दौरा केला आणि अयोध्येत राम मंदिर लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरेंनी दोन दिवसीय “पहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत अयोध्येत मोठं शक्तिप्रदर्शन केलं होत आणि राम मंदिर प्रश्नावर मोदी सरकारला प्रश्न विचारले होते. त्यांचा हा अयोध्या दौरा देशभरात तर गाजलाच पण त्याची चर्चा देशाबाहेरही झाली होती. तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी १८ खासदार घेऊन उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला गेले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शहरातील लोकांवर प्रभाव पडल्याचे चित्र आहे. सध्या अयोध्या प्रश्नावर आवाज उठवणारे उध्दव ठाकरे हे एकमेव नेते असल्याने अयोध्येतील प्रतिनिधी मंडळ आता मातोश्रीवर दाखल होऊन उद्धव ठाकरे यांना आभार मानणारे पत्र देणार आहे.

पुढील महिन्यात अयोध्येतील प्रतिनिधी मंडळ उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना वारंवार अयोध्येला येण्याचे निमंत्रण देणार असल्याचे वृत्त आहे. तसेच त्यांनी अयोध्येत राममंदिर व्हावे यावर मांडल्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देणार आहे.

उद्धव ठाकरे यांची भूमिका अयोध्येतील सामान्य लोकांनाही प्रभावी वाटत असल्याने शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर वाढण्यास मदत होईल असंही चित्र आहे.

 

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक, संभाजी नगर दौऱ्यावर……..

Leave a comment

0.0/5