आपच्या विजयनानंतर कॉमेडियन कुणाल कामराचा नरेंद्र मोदींना टोला
दिल्ली विधानसभा निवडणुकीला आम आदमी पक्षाने भाजपा आणि काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडवत विजय प्राप्त केला. एकूण ७० विधानसभा जागेवर झालेल्या निवडणुकीत ६२ जागेवर आपचा विजय झाला तर भाजपाला ८ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीवर काँग्रेस पक्षाला आपले खाते सुद्धा उघडता आलेले नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. दिल्लीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे ट्विटवरुन अभिनंदन केलं आहे. मात्र मोदींच्या या शुभेच्छांवरुन कॉमेडियन कुणाल कामराने फिल्मी स्टाइल टीका केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी रात्री मोदींनी ट्विटवरुन आपचे आणि केजरीवाल यांचे अभिनंदन केलं. “दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आप आणि श्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन. दिल्लीतील नागरिकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा,” असा शुभेच्छा संदेश मोदींनी ट्विट केला आहे.
या ट्विटला कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींना टोला लगावला आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील ब्रेकअप साँग म्हणून लोकप्रिय असणाऱ्या, ‘मेरे सैयाँ जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया’च्या चालीवरच कुणालने तीन ओळी ट्विट केल्या आहेत. “दिल पे शाहीन बाग रखते हुवे मुहं पे मेकअप कर लिया, कम्युनॅलिझमसे दिल्लीने आज ब्रेकअप कर लिया” असा टोला कुणालने भाजपाला लगावला आहे.
Dil pe Shaheen Bagh rakhte hue
Muh pe makeup kar liya
Communalism se Delhi ne aaj breakup kar liya… https://t.co/BGZIjsXhf8— Kunal Kamra (@kunalkamra88) February 11, 2020