शेअर बाजार गडगडला, कोरोनाचा फटका बसला..

शेअर-बाजार-गडगडला-कोरोना-Stock-market-thunder-corona

शेअर बाजार गडगडला, कोरोनाचा फटका बसला

कोराना व्हायरसचा परिणाम आता शेअर बाजारावरही दिसू येऊ लागला आहे. मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे व्यवहार एक तासासाठी बंद करण्याची वेळ ओढावली आहे. शेअर बाजार उघडताच निर्देशांकात ३१०० अंकांनी घसरण होऊन तो ३० हजारांच्या खाली गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शेअर बाजार घसरण्याचे सत्र सुरुच आहे. सेन्सेक्स सुमारे ३१०० अंकांनी तर निफ्टी ९५० अंकांनी कोसळला आहे. दरम्यान निफ्टीमधे लोअर सर्किट लावण्यात आले आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये ४५ मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. सेन्सेक्समध्ये अद्याप सर्किट लावलेलं नाही. मात्र सेन्सेक्स साडे नऊपेक्षा जास्त टक्क्यांनी गडगडल्यास कधीही सर्किट लावलं जाऊ शकतं.

सकाळी शेअर बाजार उघडताच त्यात ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण होऊन तो २९६८७.५२ अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ९६६.१ अकांची घसरण होऊन तो ८६२४.०४ अंकांवर पोहोचला. मार्च २०१८ नंतर गुरूवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय शेअर बाजार १० हजाराच्या खाली आला होता. दरम्यान, शेअर बाजाराच्या इतिहासात याआधी दोन वेळा मार्केट बंद करण्याची वेळ आली होती, अशी माहिती शेअर मार्केट विषयातील तज्ज्ञांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here