मी सच्च्या देशभक्ताचा मुलगा! – राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण केली. आपण खऱ्या देशभक्ताचे पुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होतो. अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी महत्त्वाची पावले उचलत देशाचे सक्षमीकरण केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना प्रेम आणि कृतज्ञतेने अभिवादन करतो, असे राहुल गांधी म्हणाले.
एका ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी १९८४ मध्ये काँग्रेस पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वयाच्या ४० व्या वर्षी ते भारताचे सर्वात लहान वयातील पंतप्रधान बनले. राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला होता. २१ मे १९९१ रोजी त्यांची तामिळनाडूतील श्रीपेरुंबुद्दूर येथे एका निवडणुकीच्या सभेदरम्यान एलटीटीई या संघटनेने आत्मघाती हल्ला करत त्यांची हत्या केली होती.
एक सच्चे देशभक्त,उदार और परोपकारी पिता के पुत्र होने पर मुझे गर्व है।प्रधानमंत्री के रूप में राजीव जी ने देश को प्रगति के पथ पर अग्रसर किया।अपनी दूरंदेशी से देश के सशक्तीकरण के लिए उन्होंने ज़रूरी कदम उठाए।आज उनकी पुण्यतिथि पर मैं स्नेह और कृतज्ञता से उन्हें सादर नमन करता हूँ। pic.twitter.com/aDdKMf74wK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2020