‘निमंत्रण यादीत रंजन गोगोईं यांचे नाव असायला हवे’ – संजय राऊत

'निमंत्रण यादीत रंजन गोगो-'Ranjan Gogo on the invitation list

‘निमंत्रण यादीत रंजन गोगोईं यांचे नाव असायला हवे’ – संजय राऊत

अयोध्येच्या राम जन्मभूमीचा मुहूर्तवेढ ठरलेली आहे. येत्या ५ ऑगस्टला हा सोहळा पार पडणार असून, या सोहळ्याला देशातील अनेक मान्यवरांना आमंत्रित केलेले आहे. मात्र आमंत्रण यादीत माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोईं यांचे नाव असायला हवे होते, असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे आता राज्यसभेचे सदस्य आहेत. पण ते मुख्य न्यायाधीशांच्या खुर्चीवर विराजमान होते तेव्हाच अयोध्या रामाचीच ! मंदिर तेथेच होईल !, असा निर्णय गोगोई यांनी दिला. त्यामुळे मंदिराच्या भूमिपूजनासाठी जी खास निमंत्रितांची यादी बनवली जाईल, त्यात खासदार रंजन गोगोई यांना मानाचे स्थान मिळायलाच हवे असे संजय राऊत यांनी सामनात म्हटले आहे.

शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटना आणि अलीकडे रंजन गोगोईंसारखे रामभक्तांमुळेमुळे अयोध्येत राममंदिर उभारणीची पहिली कुदळ मारली जाईल. या आंदोलनाचा पाया आणि कळस उभारणारे अशोक सिंघल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत, याची आठवणही राऊत यांनी करून दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here