अमानुष कृत्य करणाऱ्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे ! – अजित पवार

अमानुष-कृत्य-करणाऱ्यांना-Inhuman-doers

अमानुष कृत्य करणाऱ्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे ! – अजित पवार

उत्तरप्रदेश हाथसार येथील एका दलित तरुणीवर सवर्ण समाजाच्या चार व्यक्तींनी बलात्कार केला होता. आज उपचारादरम्यान या पीडित तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक आत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे. असं अमानुष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उत्तरप्रदेश सरकारने सदर प्रकरणातील नयायलयीएन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून आरोपींना त्याच्या पापाचे फळ लवकरात लवकर द्यावे. न्यायालयाच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देत स्त्रीशक्तीचा आदर काण्यात सभ्य समाजाची निर्मिती करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले आहे. हाथरसची घटना ही या देशातील शेवटची घटना ठरावी यासाठी शासन, न्यायालय आणि समाज सर्वजण मिळून प्रयत्न करतील, आपापली जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाथरस येथील पीडीत तरुणीला श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here