हाथरस पीडितांच्या बदनामी प्रकरणी अर्णब गोस्वामी विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल?
हाथरस येथे एका अल्पवयीन मुलीवर तेथील स्थानिक सवर्ण जातीच्या मुलांनी केलेल्या अमानुष बलात्कार प्रकारानी संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यात उत्तरप्रदेश प्रशासनाच्या संशयास्पद वागणुकीमुळे सदर प्रकरण सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असेच दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
त्यात आर. भारत वृत्तसमूहाने ‘पुछता है भारत’ या आपल्या कार्यक्रमात हाथरस पीडितांची बदनामी होईल असा आशयाचा कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमातून प्रसारित केला होता. या कार्यक्रमाद्वारे गोस्वामी यांनी पीडित कुटुंबीयांची बदनामी होईल, असे आरोप त्यांच्यावर लागले होते.
या प्रकरणाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राहुल डांबले यांनी अर्णब गोस्वामी विरोधात येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
1 Comment
Pramod Laxman Pawar
राहूल डांबले साहेब, आपण एक चांगले काम केले आहे, आम्ही आपल्या पाठीशी आहोत… मुंबई आणि महाराष्ट्रात येण्याची त्याची हिंमत नाही…