“अधिकारी म्हणत होते खात्यात किती पैसे आले माहित आहे का?” – पीडित कुटुंब
हाथसार येथे दलित अल्पवयीन मुलीवर तेथिल स्थानिक सवर्ण समाजाच्या इसमांनी बलात्कार करून तिच्यावर अमानवी कृत्य केले होते. या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण पसरले होते. त्यातच सदर मुलीचा मृतदेह संशयास्पद तिच्या राहत्या गावात आणून तिच्यावर कुटुंबीयाचा विरोध डावलून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावर आता प्रसार माध्यमांशी संवाध साधताना पीडित कुटुंबीयांनी आपल्या व्यथा मांडल्या.
पुढे बोलताना पीडित कुटुंबीय म्हणाले की, शेवटी आम्हाला आमच्या मुलीचा चेहरादेखील पाहू दिला नाही. तसेच एका अधिकाऱ्यानं तुमच्या खात्यात किती पैसे आले हे तुम्हाला माहित आहे का? असेही म्हटल्याचे त्यांनी सांगितले. “एसआयटीची टीम आणि दुसरे अधिकारी आपल्या घरी आले होते तेव्हा ते बोलत होते. तुम्हाला पैसे मिळणार आहेत… तुम्हाला माहित नाही तुमच्या खात्यात किती पैसे आले? असे त्यावेळी अधिकारी म्हणत असल्याचं पीडितेच्या आईने सांगितले.
आजतक या वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी आपली व्यथा मांडली. दरम्यान, “आपल्या खातात किती पैसे आले हे माहित नाही. परंतु आपल्याला न्याय पाहिजे असंही त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्या अन्य कुटुंबीयांनीदेखील संवाद साधला. “या प्रकरणी कोणाला हटवण्यात आलं याची माहिती आपल्याला नाही. आपल्याला या प्रकरणी सीबीआयकडूनही तपास नको. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांमार्फत झाला पाहिजे. त्यांच्या अध्यक्षतेखाली तपास झाला पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.