उत्तरप्रदेश सरकारला राष्ट्र्वादीने पाठवल्या बांगड्या
उत्तरप्रदेशातील हाथसार येथे एका दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तसेच
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भेटण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर करण्यात आलेल्या धक्काबुक्की आणि लाठीचार्ज विरोधात सर्वत्र देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यातच आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बांगड्या पाठवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली. तसेच गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की पाहता देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे चालली आहे, असे म्हटले जात आहे. याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्पेशल चायनामेड बांगड्या पाठवून निषेध केल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सेक्रेटरी पठाण यांनी सांगितले आहे.