उत्तर प्रदेश येथील हातरस आणि बलरामपूर सामूहिक बलात्कार प्रकरण सतत चर्चेत असतानाच
भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका नेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सदर पीडिती विद्यार्थिनी बीए वर्गात शिकत असून तिने कर्नलगंज पोलिस स्थानकात भाजपा नेत्यावरीधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे हाथरस प्रकरणातील संपूर्ण देशभरात खराब झालेली छबी सुधारण्याच्या प्रयत्न करत असलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयागराज मधील सामूहिक बलात्काराचा आरोपी असलेला भारतीय जनता पक्षाचा नेता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी याला अटक केली आहे.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी डॉ. अनिल द्विवेदी याला पोलिसांनी आधीच अटक करून तुरुंगात पाठविले होते. यासंदर्भात पोलिसांनी आता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी याला अटक केली आहे.
पीडीत मुलगी बीएची विध्यार्थ्यांनी असून तिने प्रयागराज येथील कर्नल गंज पोलिस स्थानकामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी भाजपा नेता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी फरार होता. मात्र पोलिसांना त्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
सध्या हाथसार येथील घटनेमुळे उत्तरप्रदेशातील योगी सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची मागणी होत आहे. त्यातच भाजपा नेत्याला बलात्काराच्या गंबीर आरोपाखाली अटक झाल्यामुळे पुन्हा विरोधकांनी जोरदार टीका योगी सरकारवर केली आहे. यापूर्वी उन्नावचे भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगर यांनाही बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले गेले होते, त्यामुळे भाजपा उत्तरप्रदेशात बॅकफूटवर जाताना दिसत आहे.