सोशल मीडियावर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर डिस्कलाईकचा पाऊस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात देशाच्या नागरिकांशी बातचीत केली होती. यातच मोदी यांच्या चालू भाषणात नेटकऱ्यांनी डिस्कलाईकचा पाऊस पडल्यामुळे मोदी समर्थकांची चांगलीच भंभेरी उडाली होती.
#BoycottModiBhasan हा मोदींच्या भाषणावर बहिष्काराचा ट्रेंड सध्या टॉपवरुन असून, युट्युबवर डिसलाईक वाढल्यानंतर भाजपने लाईक- डिसलाईचा पर्यायच काढून घेतला होता. सोशलमिडीयाच्या आधारे प्रपोगंडा आणि प्रचारात आघाडीवर असलेल्या भाजपाला आज पुन्हा सोशलमिडीयावर नामुष्कीला सामोरे जावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सायंकाळी सहा वाजेचे हे भाषण सुरु होण्याआधीच नेटीझन्सनी युट्युबवर डिसलाईकचा मारा केला. मोदींचा सहा वाजता भाषण सुरु झाल्यानंतर डिसलाईकचे प्रमाण वाढतच गेले. अखेल भाजप आयटीसेलनं हतबल होऊन युट्युबवरील या भाषणाचे लाईक- डिसलाईचा पर्यायच काढून घेतला. #BoycottModiBhasan हा मोदींच्या भाषणावर ट्रेंड ट्विटर आणि फेसबुकवर जोरात सुरु होता. आताच्या घडीलाही #BoycottModiBhasan हा ट्रेंड टॉपमध्ये आहे.