बिहार निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मोफत लस वाटपाच्या आश्वासनावर खासदार चतुर्वेदी यांची टीका
भाजपाकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासने दिलेली आहे. मात्र या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी मोफत वॅक्सीन अर्थात कोरोना लस वाटण्याची घोषणा अर्थमंत्री निर्णयाला सीतारामन यांनी केली आहे.
त्यांच्या या घोषणेवर आता शिवसेना नेत्या, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘कोरोनाची लस अजून आलेली नाही तरीही भाजपकडून मात्र त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जातोय. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्याला नको का? असे ट्विट करत प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला प्रश्न विचारत टीका केली आहे.