Skip to content Skip to footer

‘हा आचारसंहितेचा भंग आहे’, मंत्री आव्हाड यांची अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्यावर आरोप


‘हा आचारसंहितेचा भंग आहे’, मंत्री आव्हाड यांची अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्यावर आरोप

भाजपाकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासने दिलेली आहे. मात्र या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी मोफत वॅक्सीन अर्थात कोरोना लस वाटण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर संपूर्ण देशभरातून भाजपावर जोरदार टीका होताना दिसून येत होती.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ‘’निवडणूकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हाला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे’, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे निर्मला सितारामन यांनी म्हटले होते. भाजपच्या या निर्णयावर आव्हाड यांनी सडकावून टीका केली आहे. ‘निस्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे’, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5