Skip to content Skip to footer

बिहार निवडणूक : भाजपच्या जाहिरातीतून नितीश कुमार गायब ?


बिहार निवडणूक : भाजपच्या जाहिरातीतून नितीश कुमार गायब ?

बिहार निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या भाजपाकडून लढवल्या जात आहेत. त्यात कोरोना संसर्ग आजरावरील लस मोफत देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने बिहारच्या जनतेला दिले होते. मात्र आता भाजपचे सहयोगी पक्ष असलेली जेडीयु अर्थात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर बिहारची जनता नाराज असल्याचे चित्रं दिसून येत आहे.

नुकतेच एका रॅलीसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार मुजफ्फरपूरच्या सकरा भागात जनतेला संबोधित करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, या सभेसाठी मांडण्यात आलेल्या अनेक खुर्च्या रिकाम्याच दिसल्या. ‘आम्ही सर्वांसाठी काम केलंय. अगोदर तळागाळातल्या लोकांना कोण विचारत होतं? आम्ही त्यांना पुढे येण्याची संधी दिली’, असे त्यांनी बोलून दाखविले होते.

मात्र विशेष करून बिहार निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या जाहिरातींवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोटो गायब आसल्याचे चित्रं दिसून आले होते. त्यामुळे सहयोगी पक्षाच्या नेत्यांना भाजपा डावलत आहे का ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Leave a comment

0.0/5