Skip to content Skip to footer

भाजपची साथ घेण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईन ; मायावतींचे स्पष्टीकरण

भाजपची साथ घेण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईन ; मायावतींचे स्पष्टीकरण

आगामी व भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकांमध्ये भाजपची साथ घेऊन त्यांच्यासोबत युती करणार नाही, असे बसपा प्रमुख मायावती यांनी जाहीर केले आहे. तस करण्यापेक्षा मी राजकीय संन्यास घेईन, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

उत्तर प्रदेशात विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असे मायावती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावर मुस्लिम जनतेने बसपाला डावलावे म्हणून काँग्रेस आणि समाजवादी पक्ष माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत असल्याचा आरोप करत नवे स्पष्टीकरण दिले आहे.     

पुढे त्या म्हणाल्या की, भाजपा आणि बसपा यांची विचारसरणी पूर्णपणे विरोधी भूमिकांची असून, त्यामुळे भाजपशी युती करण्याचा मुद्दाच निर्माण होत नाही.

Leave a comment

0.0/5