Skip to content Skip to footer

फारूक अब्दुल्ला यांनी पाकिस्तानात जाऊन ३७० कलम लागू करावं! – खा. संजय राऊत

फारूक अब्दुल्ला यांनी पाकिस्तानात जाऊन ३७० कलम लागू करावं! – खा. संजय राऊत

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका मोठ्या कार्यक्रमात जम्मू काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही, असे सांगितले. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं’, असं ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, फारुख अब्दुल्ला यांना देशातून बाहेर पडून पाकिस्तानात कलम ३७० लागू करायचे आहे का? काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करावे, असे कोणताही राष्ट्रभक्त म्हणणार नाही. हे ज्यांना नकोय, त्यांचा पाकिस्तानशी संबंध असेल. परिणामी कलम ३७० पुन्हा लागू करु, अशी वक्तव्ये करणाऱ्यांची डीएनए टेस्ट करायला पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

तसेच कलम ३७० रद्द झाल्याने देशाच्या इतर भागातील उद्योजकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये उद्योग क्षेत्राला गती येईल. येथील लोकांना रोजगार मिळतील. काश्मीरची जनता मुख्य प्रवाहात येईल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Leave a comment

0.0/5