आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा!, कराचीच नंतर बघू – संजय राऊत

आधी-पाकव्याप्त-काश्मीर-भ-Pre-Pakistan-covered-Kashmir-Bh
ads

आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा!, कराचीच नंतर बघू – संजय राऊत

मुंबईतील कराची स्वीट्स या बेकरीचं नाव बदलण्याच्या मागणीवरुन आता जोरदार राजकारण सुरू झाले आहे. शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केलेल्या या मागणीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ‘कराचीच एक दिवस भारतात असेल’, असे म्हटलं आहे. यावर वक्तव्य करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांनी टोला लगावला आहे.

फडणवीसांवर टीका करताना राउत म्हणाले की, “आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीच नंतर बघू”. मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचे नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. कराची पाकिस्तानातील शहर आहे त्यामुळे या शहराच्या नावाने भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो अस नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं.

दरम्यान, “मुंबईत मागील ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आता त्यांच नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. त्यांच नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here