“नवा शेतकरी कायदा, मात्र संपूर्ण फायदा अब्जाधीश मित्रांचा” – प्रियांका गांधी

नवा-शेतकरी-कायदा-मात्र-सं-New-farmer-law-only-no

“नवा शेतकरी कायदा, मात्र संपूर्ण फायदा अब्जाधीश मित्रांचा” – प्रियांका गांधी

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या शेतकरी कायद्याविरोधात पंजाब , हरियाणा येथील शेतकरी अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मोदी सरकारच्या या काळ्या शेतकरी कायद्याविरोधात आमचं आंदोलन सुरूच राहणार, तसेच दिल्लीत प्रवेश करण्यात येणाऱ्या पाचही प्रवेश मार्ग आम्ही बंद करू, असा इशारा मागच्या चार दिवसांपासून दिल्ल्लीत ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यात हे आंदोलन अधिक चिघळत असल्याचे दिसून येत आहे. यावर आता काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियाने गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

“नाव शेतकरी कायदा मात्र संपूर्ण फायदा अब्जाधीश मित्रांचा. शेतकरी कायदा शेतकऱ्यांशी चर्चा न करता कसा बनू शकतो? त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताकडे कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते? सरकारला शेतकऱ्यांचे म्हणने ऐकावे लागेल. या सर्वजन मिळून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवू ” असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. ज्यामध्ये, “सरकारकडे आमची मागणी आहे की, आपल्या अधिकारांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात हिंसा व अत्याचार बंद करा. शेतकऱ्यांचा आवाज व त्यांच्या व्यथा ऐका” असे सांगण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here