Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची जागा घेऊ शकतात. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाला मात देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. या संदर्भातील बातमी झी २४ तास या वृत्तवाहिनीने दिली आहे.

भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशाच्या राजकारणात गांधी कुटुंबा व्यतिरिक्त पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे.

शरद पवार यांच्या माध्यमातून युपीए अधिक बळकट करण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली जात आहे. भाजपाला रोखण्यासाठी आणि युपीए अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला मात देण्यासाठी शरद पवारांची जादू कमी आली होती. तीच जादू आता तोच फॉर्मुला केंद्रीय स्थरावर वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5