Skip to content Skip to footer

मोदी सरकार पुढे फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्ग झुकला

कृषी विधेयक विरोधात शेतकऱ्यांचा आवाज संपूर्ण जगभरात पोहचवण्यासाठी “किसान एकता फेसबुक” पेजवर फेसबुकने कारवाही करत अकाऊंट बंद केले आहे. कम्युनिटी स्टँडर्डचे कारण देत फेसबुकने हे पेज बंद केले आहे. याबाबत किसान एकता मोर्चाने ट्विट करून माहिती दिली होती.

फेसबुकचे कम्युनिटी स्टँडर्ड हे फक्त भाजप विरोधी लोकांच्या विरोधातच काम करत असते.याशिवाय इतर दल आणि इतर संघटना आयटी सेल यांचे पेजेस फेक न्यूज चा भडिमार हे सर्व बेधडक सुरू असते. याविषयीच्या बातम्या अनेकवेळा वाचण्यात आलेल्या आहेत.

देशभरात शेतकरी आंदोलन हा मुद्दा तापत असल्याने देशभरातील नागरिक यावेळी किसान एकता मोर्चा बाजूने उभे राहिले.अनेकांनी फेसबुकचे निर्माते संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना याबाबत थेट जाब विचारला.अनेकांनी जागतिक पातळीवरील न्यूज एजन्सीसना याबाबत माहिती दिली.यामुळे फेसबुकचे धाबे दणाणले आहेत त्यामुळंच या पेजवर कारवाही करण्यात आलेली आहे.

Leave a comment

0.0/5