Skip to content Skip to footer

नाताळच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नाताळच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

कोरोनामुळेउद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा केला जात आहे. या सणानिमित्त अर्थात येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशवासियांनानाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मेरी ख्रिसमस! प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्वं जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकानं आनंदी आणि निरोगी रहावं”

दरम्यान, करोनाच्या संकाटाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळ साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Leave a comment

0.0/5