Skip to content Skip to footer

FB वर शिक्षिकेला दाखवलं शरीरविक्रय करणारी महिला, शाळेतल्या मुलाचं कृत्य

एका रात्रीसाठी १५०० रुपये आकारले जातात असा मेसेज….

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर आपल्या शिक्षिकेचं बनावट अकाऊंट उघडून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर या मुलाने शिक्षिकेला शरीरविक्रय करणारी महिला असल्याचे दाखवलं. तिच्या फोटोग्राफमध्ये बदल करुन, सोबत तिचा मोबाइल नंबरही अपलोड केला. या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या चुलत भावाला दोघांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे, तर इंटरनेट एक्सेस करण्यासाठी ज्या चुलत भावाचं सीम कार्ड वापरलं, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. शिक्षिकेला त्रास देण्यासाठी सोशल मीडियावर आपण तिचं बनावट प्रोफाइल बनवल्याचं मुलाने सांगितलं. सायबर क्राइम अधिकारी विजय तोमर यांनी ही माहिती दिली. या मुलाने असं का केलं? ते अजून स्पष्ट झालेलं नाही.

महिन्याभरापासून हा मुलगा शिक्षिकेच्या घरी गणिताच्या शिकवणीसाठी जात होता. पण या मुलाच्या विचित्र वागण्यामुळे नंतर तिने त्याची शिकवणी बंद केली. बनावट अकाऊंटमुळे या शिक्षिकेला नंतर फोन यायला सुरुवात झाले. व्हॉट्स अ‍ॅपवरील डीपीच्या फोटोमध्ये बदल करुन, तो फेसबुक आयडीसाठी वापरण्यात आला होता. एका रात्रीसाठी १५०० रुपये आकारले जातात असा मेसेज तिच्या बनावट फेसबुक अकाऊंटवर लिहिला होता, असे तोमर यांनी सांगितले. जेव्हा या महिलेला मोठया प्रमाणात कॉल येऊ लागले, तेव्हा तिने पोलिसात धाव घेतली व तक्रार नोंदवली.

Leave a comment

0.0/5