Skip to content Skip to footer

पंतप्रधान मोदींसह सर्व मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांना दिली जाणार लस

पंतप्रधान मोदींसह सर्व मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांना दिली जाणार लस

देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झालेली आहे. पहिल्या टप्यांत प्राधान्याने कोरोनाच्या संकटात आहोरात्र सेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना करोनाची लस टोचण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देण्याची घोषणा केली होती.

Leave a comment

0.0/5