चार तृतीयपंथींनी मिळून भर रस्त्यात केली वाहतूक पोलिसाला मारहाण.

 

मुंबई पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहेत. या घटनेला आळा घालण्यासाठी गृहखात्याकडून कठोर पाऊले उचलली जात असली तरी पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालणे अद्याप शक्य झालेले नाही.

अशीच घटना आता मुंबई येथे घडलेली आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चार तृतीयपंथींनी मिळून मारहाण केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. लवली करण पाटील, विकी रामदास कांबळे, तनू राज ठाकूर, जेबा जयंत शेख अशी या चार तृतीयपंथींची नावे आहेत. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

प्रकरण असे की, कोरोनाच्या संसर्गामुळे रिक्षातून फक्त तीनच व्यक्ती प्रवास करू शकतात. मात्र हे चारही आरोपी एकाच रिक्षातून प्रवास करत असल्याचे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. यावेळी रिक्षाचा फोटो घेत असल्याचे पाहून तृतीयपंथीयांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. पुढे या हुज्जतीचे भांडणात रूपांतर झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here