Skip to content Skip to footer

आश्चर्यम, काँग्रेसकडून चक्क पेट्रोल, डिझेल दरवाढी ची मागणी; पहा व्हिडीओ

संपूर्ण देशात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वणवा पेटलेला आहे. जनतेच्या मनात संताप पसरला आहे. असे असतांना केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्याची मागणी केली आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये होणारी भाव वाढ रद्द करावी, त्यांचे दर कमी करावेत यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. यात केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलन केले. मात्र या आंदोलनात काँग्रेसने पेट्रोल दरवाढ कमी करण्याऐवजी ‘पेट्रोल डिझेल दरवाढ झालीच पाहिजे’ अशी घोषणा केल्या. या विनोदी घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

पहा विडिओ:

देशातील प्रमुख विरोधी पक्षाने अशी मागणी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेटकर्‍यांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे. तीनदा घोषणा दिल्यानंतर चौथ्यांदा आपण कशाची मागणी करतोय हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर खुद्द कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Leave a comment

0.0/5