नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहताना राहुल गांधी लिहतात की, “सरदार पटेल हे एक खरे देशभक्त होते. त्यांनी स्वतंत्र, एकसंघ आणि धर्मनिरपेक्ष भारतासाठी मोठा संघर्ष केला आहे. सरदार पटेल खऱ्या अर्थाने लोह पुरुष होते. ते द्वेषाला व सांप्रदायिकतेला थारा देत नसत कारण ते एक खरे काँग्रेसी होते. असे भारत मातेचे थोर पुत्र सरदार वल्लभभाई पाटील यांना मानाचा मुजरा.”
Sardar Patel was a patriot, who fought for a independent, united & secular India. A man with a steely will, tempered by compassion, he was a Congressman to the core, who had no tolerance for bigotry or communalism. On his birth anniversary, I salute this great son of India.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 31, 2018
आणखीन एका ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावर टीका करताना “पहा काय विरोधाभास आहे. एकीकडे सरदार पटेलांचा पुतळा उभारण्यात येत आहे तर दुसरीकडे त्यांनी स्वतंत्र भारतामध्ये ज्या संस्था निर्माण करण्यात मोलाची मदत केली त्या संस्था उध्वस्त करण्यात येत आहेत. भारतातील सरकारी संस्थांचे अवमूल्यन हे देशद्रोहापेक्षा कमी नाही.” असा संदेश त्यांनी दिला आहे.
Ironic that a statue of Sardar Patel is being inaugurated, but every institution he helped build is being smashed. The systematic destruction of India's institutions is nothing short of treason. #StatueOfUnity
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 31, 2018