अजान सुरु झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भाषण थांबवलं

अजान सुरु झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भाषण थांबवलं | aditya thackeray halts speech for azaan

बुलडाणा | अजान सुरु झाल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना खासदाराचं भाषण थांबवलं. बुलडाण्यातील मेहकरमध्ये ही घटना घडली.

शिवसेनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार प्रतापराव जाधव प्रास्ताविक करत होते.

प्रास्ताविक सुरु असताना अजान सुरु झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जाधव यांना भाषण थांबवण्यास सांगितलं.

जाधव यांनीही भाषण थांबवलं. अजान होईपर्यंत शांतता पाळण्यात आली आणि त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here