इंदिरा गांधीनी पुरलेल्या कालकुपीचे रहस्य आजही कायम

इंदिरा गांधीनी पुरलेल्या कालकुपीचे रहस्य आजही कायम | indira gandhi time capsule

सत्तरच्या दशकात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इन्दिरा गांधी या यशाच्या उत्त्युच्च शिखरावर असताना त्यांनी लाल किल्ला परिसरात टाईम कॅप्सूल म्हणजे कालकुपी पुरली होती. या कालकुपिचे रहस्य आजही कायम आहे. स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने या काळात देशाने काय मिळविले आणि कसा संघर्ष केला याची आठवण साठवून ठेवण्यासाठी हि कालकुपी पुरून ठेवण्याची कल्पना सुचविली गेली होती आणि त्यात साठविण्याच्या मजकूर तयार करण्याचे काम इंडियन कौन्सिल ऑफ हिस्ट्रीकल रिसर्च कडे सोपविले गेले होते.

एक पुस्तकातील उल्लेखानुसार हि कालकुपी १५ ऑगस्ट १९७३ रोजी लाल किल्ला परिसरात जमिनीत खोलवर पुरली गेली होती. मात्र तेव्हापासून त्यावर वाद सुरु झाला होता. देशातील विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांनी त्यांच्या घराण्याचा महिमा असलेला मजकूर कालकुपीत बंद केल्याचा आरोप केला गेला होता. त्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधी याच्या हातून सत्ता जाऊन जनता दलाचे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. आणि त्यांनी सत्तेवर येतानाच कालकुपी पुन्हा वर काढून पहिली जाईल असा वादा केला होता.

त्यानुसार हि कालकुपी जमिनीतून वर काढली गेली मात्र त्यात नक्की काय नोंदी होत्या याचे रहस्य कायम राहिले. प्राचीन काळापासून अश्या कालकुपी वापरण्याची प्रथा होती. हि कुपी विशिष्ठ पदार्थ वापरून तयार केली जाते, तिच्यावर कोणत्याची हवामानाचा, पाण्याचा परिणाम होत नाही. या कुपिचा मुख्य उद्देश कोणत्याही देश, तेथील समाज, पूर्वीचा काळ, त्यावेळचा इतिहास सुरक्षित ठेवणे हा असतो. भविष्यातील पिढ्यांना या निमित्ताने बरीच महत्वाची माहिती मिळू शकते आणि गतकाळाचा इतिहास जाणून घेता येतो.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीही अशीच कालकुपी २०११ साली जमिनीत पुरल्याचा आरोप केला जात होता आणि हि कालकुपी गांधीनगर येथील म. गांधी मंदिराखाली पुरली गेल्याचे सांगितले जात होते. तेव्हा मोदींवर सुद्धा स्वतःचे गोडवे गाणारा मजकूर कालकुपीत बंद करून ठेवल्याचा आरोप वारंवार केला गेला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here