Skip to content Skip to footer

मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारची मोठी घोषणा

मुंबई | मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनात मृत पावलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

राज्य शासनाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मंजूर केले. त्यानंतर शनिवारी दिवाकर रावते यांनी मराठा आंदोलनात मृृत पावलेल्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात 40 जणांनी आपला जीव गमावला होता. त्यांच्या कुटुंबाला 15 लाख रूपयांची मदत करण्यात यावी. तसंच एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.

दरम्यान, 1 डिसेंबर पासून राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आलं आहे.

Leave a comment

0.0/5