Skip to content Skip to footer

‘देश का चौकीदार चोर है’, मोदींविरोधी घोषणांनी रंगल्या पंढरीच्या भिंती

पंढरपूरपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध सर्वश्रुत आहे. या आरोपप्रत्यारोपाचे लोण आता पंढरपूरमध्ये येऊन पोहचले असून ‘गली गली मे शोर है देश का चौकीदार चोर है’ या आणि अशा प्रकारचे टीकात्मक घोषणांनी पंढरीच्या भिंती रंगल्या आहेत. सोलापूर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी या भिंतीबाजीची जबाबदारी स्वीकारली असून पक्षाचा हा अजेंडा असल्याचे सांगितले आहे

शहरातील दर्शनी भागात असलेल्या खाजगी आणि सरकारी भिंती मोदींच्या टीकात्मक लिखानांनी बरबटल्या असून या भिंतीवर पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर उपहासात्मक टिप्पणी करण्यात आली आहे, तर राहुल गांधी यांना प्रोत्साहीत करणाऱ्या कमेंट करण्यात आल्या आहेत.

‘राहुल गांधी तुम संघर्ष करो महाराष्ट्र आपके साथ है, लाठी काठी खायेगे मगर काँग्रेस की सत्ता लायेगे’, ‘जेल भी जायेगे राहुल गांधी को लायेगे’, यासह ‘गली गली मे शोर है, देश का चौकीदार चोर है’, आदी घोषणांनी पांढऱ्या भिंती रंगीबेरंगी झाल्या आहेत.

निवडणुकीचा बिगुल वाजण्यास बराच अवधी असताना पंढरीतील काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भिंतीबाजी सुरु केल्याने या टीकेला भाजप कसे उत्तर देते याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.

Leave a comment

0.0/5