उध्दव ठाकरे यांचा पंढरपुर दौरा बेरजेचा की वजाबाकीचा ?

उध्दव ठाकरे यांचा पंढरपुर दौरा बेरजेचा की वजाबाकीचा |uddhav thackeray in pandharpur

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यात पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजीराव सावंत यांनी सोलापुर आणि उस्मानाबाद जिल्हयाचे संपर्क प्रमुख म्हणुन सुत्रे हाती घेतल्या पासुन संघटनात्मक फेरबदलाचा सपाटा लावला आहे. त्यात जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सर्वच पदे बदलुन नवीन टीम निवडणुकांच्या तोंडावर सज्ज केली आहे त्यातले बरेच पदाधिकारी प्रमुख मतदार संघामध्ये परिचीत नसलेले चेहरे आहेत. परंतु ते संपर्क प्रमुखाच्या खास मर्जीतले आहेत. अशी चर्चा चालू आहे. त्यामुळे फेरबदलाचे परिणाम सकारात्मक होतील की नकारात्मक होतील हे येणारा काळ ठरवेल.

त्यातही तानाजी सावंत मंत्री होणार आहेत, अशी चर्चा चालू आहे. कारण आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांचा कार्यकाल जानेवारी मध्ये संपतोय. म्हणुन मंत्रिपदासाठी त्यांच्या समर्थनार्थ दोन्ही जिल्ह्यातुन प्रत्येक नवीन पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रमुखांनी समर्थन पत्रे घेतली आहेत परिणामी दोन जिल्हे आपल्या पाठीमागे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न सावंत यांच्याकडून चालला आहे. असही बोलले जात आहे.

फेरबदलाच्या निवडीमुळ प्रचंड नाराजी धुमसत आहे यामध्ये उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड, परंडा चे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, उद्योगपती शंकर बोरकर सोलापुरचे पुरुषोत्तम बरडे, अकलुजचे धवलसिंह मोहिते पाटील, कुर्डुवाडीचे धनंजय डिकोळे, माळशिरसचे नामदेव वाघमारे असे अनेक राजकीय दिग्गज ज्यांनी साखर पट्टयातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेसाठी दोन हात केले असे सर्व निष्ठावंत त्रासले आहेत की पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी यात लक्ष घालाव अशी मागणी सामान्य शिवसैनिकाकडून केली जातेय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा नक्की कोणत्या मुद्द्यांनी गाजणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here