मध्य प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसकडून कमलनाथ यांचं नाव आघाडीवर आहे.
72 वर्षांचे कमलनाथ मध्य प्रदेशाल्या छिंदवाड्याचे विद्यमान खासदार आहेत. ते गेल्या 3 दशकांपासून तिथून निवडून येत आहेत.
कमलनाथ मूळचे उत्तर प्रदेशातले असून कानपूरमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. प्रसिद्ध डून स्कूलमधून त्याचं शिक्षण झालं आहे.
कमलनाथ कोलकात्यातील सेंट झेविअर्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कोलकात्यातच त्यांनी त्यांचा व्यापार सुरू केला.
कमलनाथ यांनी राजकीय भूमी मात्र सुरुवातीपासूनच मध्य प्रदेश राहिली आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते जवळचे मित्र होते. राजीव गांधी यांनीच त्यांना छिंदवाड्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती.
कमलनाथ यांनी मनमोहन सिंग सरकारच्या काळात वाणिज्य आणि उद्योग, शहरी विकाससारखी वेगवेगळी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
1980 पासून ते सातत्यांने छिंदवाडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. 1996 च्या निवडणुकांचा मात्र त्याला अपवाद आहे.
मध्य प्रदेशातल्या निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांनी त्यांच्यावर मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली होती.