Skip to content Skip to footer

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी पक्षाच्या मा. खासदार निवेदिता माने आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला कायमचा राम राम ठोकून आज शिवसेना पक्ष प्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांच्या हातुन शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मा. खा. निवेदिता माने यांचे पुत्र मा.
धैर्यशिल माने यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या कडून शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. कोल्हापुरातून हातकलंगणे भागातून निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशिल माने हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे असे बोलले जात आहे.
निवेदिता माने ह्या हातकणंगले या मतदार संघातून दोनवेळा राष्ट्रवादी कडून खासदार म्हणून दिल्लीत निवडून गेल्या आहे. तसेच माने परिवाराचे मोठे जनमत व प्रभाव हातकणंगले मतदार संघात आहे. या प्रवेशाने राष्ट्रवादीला कोल्हापुरात मोठा धक्का बसलेला आहे असे बोलले जाते. आज कोल्हापुरात राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती पाहता, आज कोल्हापुरात धनंजय महाडिक हे कोल्हापूर मतदार संघात राष्ट्रवादी कडून निवडून आले तरी त्यांनी पक्षा विरुध्दच भूमिका मांडल्या आहे.
येत्या १७ व १८ डिसेंबर रोजी युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांचा दोन दिवसीय दौरा कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. त्याचा आधी शिवसेना पक्षात मा.खासदार निवेदीता माने यांच्या पक्ष प्रवेशामुळे होणाऱ्या दौऱ्याला अधिकच महत्व प्राप्त झालेले आहे व पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. या दौऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार,खासदार आणि मंत्री शिवसेनेचा संपर्कात येण्याची दाट शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5